“लिव्ह इन प्रेसेंट, वास्तवात जगा” हे वाक्य आपण नेहमी ऐकत असतो. आजच्या कम्युनिकेशन स्कीलच्या जगात याचे फार महत्व सुद्धा आहे. एखाद्या व्यक्तीशी किंवा समूहाशी संवाद करतांना तो संवाद प्रभावी होण्यासाठी आपण विविध युक्त्या वापरतांना आपण अनेकांना बघतो. परंतु कुटुंबातील संवाद हेल्दी राहण्यासाठी आपण आपल्या संवादाकडे लक्षच देत नाही. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये सुसंवाद होणे हा एका हेल्दी कुटुंबासाठी फार महत्वाचा आहे.

      बदलत्या काळानुसार कुटुंब व्यवस्थासुद्धा बदलतांना आपण बघतो आहे. पर्सनल प्रायव्हसीच्या या युगात लहान मुलांपासून सगळ्यांच्या सेपरेट रूम असतात. एकाच घरात असूनही आपल्या प्रायव्हेट रूम मधील प्रत्येकच जग हे वेगळ असत. घरात येण्याजाण्याच्या वेळा प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. जेवणाच्या वेळासुद्धा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे एकमेकांशी फार कमी वेळा संवाद होतो. फास्ट लाईफच्या युगात संवादाचाही फास्ट(उपवास) असतो.

      आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे. सगळे संपूर्ण जगाशी कनेक्ट झाले आहे. परंतु आपण घरात एकमेकाशी किती कनेक्टेड आहोत? हा प्रश्नच आहे. घरात सगळे एकत्र बसले असतांना आपण मोबाईल स्क्रीनवर दुसरीकडेच संवाद करीत असतो. परंतु समोर असलेल्या व्यक्तींशी आपला संवाद होत नाही. म्हणजेच आपण वास्तवात जगात नाहीये. आपल लक्ष समोरच्या व्यक्तीकडे नाहीये. पती-पत्नी, भाऊ-बहिण, मुल आणि पालक काच रूममध्ये असून ते त्यांच्या वेगळ्याच विश्वात गर्क असतात. बेडरूममध्ये जेव्हा पती-पत्नी दिवसभरातील शेयारिंग करू इच्छित असतील किंवा एखादी महत्वपूर्ण गोष्ट सांगायची असेल आणि पती/पत्नी जर आपल्या मोबाईल स्क्रीनवर बिझी असेल तर हे वागण अपमानस्पद वाटत. कारण आपण वास्तवात जगत नाहीये. सुसंवाद व्हायचा असेल तर आपण समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याकडे निट लक्ष देवून ऐकल पाहिजे. म्हणजेच वास्तवात जगले पाहिजे. याने एकमेकांविषयी प्रेम आणि सम्मान दोन्ही वाढतात. हेच उदाहरण वरील प्रत्येक रिलेशन मध्ये लागू होत असत.

      आपल्या सगळ्यांनाच हा अनुभव असेल कि आपण कोणाशी बोलत असू आणि समोरचा व्यक्ती जर आपल्या मोबाईलमध्ये गर्क असेल तर तो आपल्याला महत्व देत नाहीये असा समज होतो.(कारण तो वास्तवात जगत नाहीये) याचा परिणाम म्हणून आपण आपले बोलणे थांबवतो आणि अपमानस्पद भाव आपल्यात निर्माण होतो. अशीच वागणूक नकळत का होईना आपण समोरच्या व्यक्तीला किंवा कुटुंबातील सदस्यांना देत असतो. यातूनच नकळत दुरावा निर्माण व्हायला लागतो आणि घरातील सुसंवाद नाहीसा होतो. म्हणून एका हेल्दी सुसंवादासाठी वास्तवात राहून समोरच्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकणे आणि त्यनुसार प्रतिक्रिया देणे हि फार महत्वाची सवय आहे. हि वास्तवात राहण्याची सवय आपण सगळ्यांनी करून घेतली पाहिजे. वैयक्तिक आणि सामाजिक दोन्ही ठिकाणी होतांना दिसतो. वास्तवात राहण्याच्या सवयीचा मोठा उपयोग नक्कीच एकमेकांशी कनेक्टीव्हिटी वाढण्यासाठी होईल. म्हणून कुठलही नात टिकवायच असेल तर वास्तवात रहा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *