आज सकाळीच बातमी वाचली अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेस फोर्स निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे भाविष्यात वेगवेगळ्या ग्रहावरील प्रगत जीवामध्ये युद्ध होऊ शकतात. अश्यावेळी आपण यासाठी सज्ज असावे म्हणून हा निर्णय त्यांनी घेतला आहे. परग्रही जीवांविषयीचे रहस्य जाणून घेण्याचे प्रयत्न आज जोमाने सुरु आहेत. अंतराळात प्रवास करण्याचे तंत्रज्ञान आता मानवाने विकसीत केले आहे. आज मनुष्य चंद्रचा व मंगळग्रहाचा अभ्यास करतो आहे. तो याचाच एक प्रयत्न आहे. आपल्या पृथ्वीवर परग्रहावरून जीव येऊन गेले आहेत असा दावा काहीजण करताना दिसतात. भविष्यात सुद्धा परग्रहावरून एलीयंस पृथ्वीवर येणार आहेत अशी शक्यता वर्तवली जात आहे. म्हणूनच कदाचित आज अमेरिकेने स्पेस फोर्स निर्माण करण्याचा निर्णय घेत आहे.

प्राचीन काळात परग्रही पृथ्वीवर येऊन गेले आणि त्यांनी मानवाला संपूर्ण ज्ञान देवून त्याच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी मदत केली आणि ते परत निघून गेले. आयुर्वेदावातरणाचा अभ्यास केला तर आपल्यला कळते कि आयुर्वेद पृथ्वीवर कसा आला. आयुर्वेदाचे ज्ञान हे भगवान ब्रम्हापासून आयुर्वेदाचे ज्ञान दक्ष प्रजापातिनी ग्रहण केले त्यांच्याकडून हे ज्ञान अश्विनिकुमारांनी घेतले. पुढे हे ज्ञान देवराज इंद्रानी प्राप्त केले. जेव्हा पृथ्वीवर रोगोद्भव झाला त्यावेळी मनुष्य जीवनात  अनेक अडचणी येऊ लागल्या. यावर उपाय म्हणून पृथ्वीवरून इंद्र्लोकात जाऊन हे ज्ञान ग्रहण करण्याचे ठरले. यासाठी योग्य म्हणून महर्षी भारद्वाज यांची नियुक्ती झाली. भारद्वाज ऋषींनी हे ज्ञान इंद्राकडून प्राप्त केले आणि आपल्या शिष्यांना हे ज्ञान दिले. अग्निवेश मग चरक अशी शिष्य परंपरा उदयास आली आणि आयुर्वेदाचा प्रचार प्रसार पृथ्वीवर झाला. हि एक काल्पनिक कथा म्हणून बघितली जातेअश्याच प्रकारच्या कथा वेगवेगळ्या खंडातील चिकित्सापद्धती बद्दल ऐकायला मिळतात. परतू साध्याकाही जे संशोधन होत आहेत आणि त्यावरून जे निष्कर्ष काढले जात आहे यावरून याची शक्यता नाकारता येत नाही. कारण #ऐंशीएंट_एलीयंसची थेरी आज मांडली जाते आहे.

प्रत्येक संस्कृतीतील देवी देवता यांच्या वास्तव्याचे ठिकाण आपण अंतरीक्ष किंवा आकाशात आहे असे मानतो. हे देवी देवता म्हणजेच प्राचीन परग्रही आहेत का? असा अभ्यास सुरु आहे. प्राचीन काळी ज्या दर्जाच्या चिकित्सा उपलब्ध होत्या त्यावरून अंदाज येतो कि हे शास्र खूप विकसित होते. आतापर्यंत उत्खनन केल्यावर ज्या कवट्या बघयला त्याचा अभ्यास केल्यावर अस लक्षात आल आहे कि. प्राचीन काळी न्यूरोसर्जरी झाल्या आहेत. कावटीवर अश्या ठिकाणी छेदन केले आहे ज्यामुळे मेंदूला इजा कमीत कमी होईल. म्हणजे त्यांचे शरीराविषयीचे ज्ञान खूप प्रगत होते. सुश्रुतानी त्यांच्या सुश्रुत संहितेत अनेक सर्जारींचे विस्तृत वर्णन केले आहे. आय सर्जरी पासून प्लास्टिक सर्जरी त्याकाळी विकसित होती. त्याकाळी एव्हडे ज्ञान असण्याची अपेक्षा आपण करू शकत नाही. याचाच अर्थ ते त्यांना कोणी तरी दिले आहे. इजिप्त, भारत, अमेरिका आणि जगातील अनेक पुरातन इमारतीवरील कोरीव काम, छायाचित्र आणि अवशेष यावरून दिसून येते कि हे ज्ञान खूप प्रगत होते. भारतीय संस्कृतीतील पौराणिक कथातून पुष्पक विमान, गरुडयान आदी यानांचा उल्लेख मिळतो. आपल्या वेदांमध्ये विमान बनविण्याची विधी सांगितली आहे. याचे मोडेल बनवून ते टेस्ट सुद्धा केले आहे ज्यावरून वैज्ञानिकांनी सांगितले कि हे उडण्यायोग्य आहेत.

खरच आपले देवदेवता म्हणजे परग्रहावरून आलेले जीव होते का? ते का आले होते? ते कुठे निगघून गेले ते परत येतील का? ब्राम्हांडात अनेक ग्रह आहेत मिल्कीवे नावाच्या आकाशगंगेत आपण पृथ्वीवर राहतो. असे कोटी कोटी ग्रह आहेत आणि असंख्य आकाशगंगा असतील ज्यात अनेक ग्रह असतील. अनेक ग्रहांवर जीव अस्तित्वात असेल याची शक्यता नाकारता येत नाही. काही पृथ्वीवर येऊन गेले असतील किंवा येणार असतील. हे तर पुढचा काळच सांगेल.

(टीप- वरील लेख हा माझा कुठलाही दावा नाही ठोस मत नाही. History चायनलवरील ANCIENT ALIENS  नावची सिरीजवरून घेतलेल्या माहितीच्या आधारावरून  लिहित आहे.)

वैद्य भूषण मनोहर देव.

ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव

अधिकृत केशायुर्वेद उपकेंद्र,जळगाव व नागपूर 

www.jyotiayurved.com

7588010703/7972641552

 drbhushandeo@gmail.com

Ayurveda ancient alien

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *