प्रिय मित्रांनो,

         आपल्या सर्वाना आयुर्वेद दिवस व धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. आपणास कळविण्यात आनंद होतोय कि आज पासून  “आयुमित्र” ह्या नावाने ब्लॉगची सुरवात करतो आहे. आपल्याशी नियमित ह्या माध्यमातून आयुर्वेदाविषयी तसेच आपल्या आरोग्याविषयी माहिती पोचवता येणार आहे. आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद व मार्गदर्शन सोबत असू द्यावे हि विनंती.

        आयुष्यः वेद आयुर्वेद| आपल्या संपूर्ण आयुष्याचे वर्णन ज्या मध्ये केलेले आहे असा तो आयुर्वेद होय. जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे म्हणजेच संपूर्ण आयुष्य सुखकारक कसे करता येईल?,  निरोगी कसे रहता येईल?  शारीरिक तसेच मानसिक व आत्मिक उन्नती कशी करता येईल ह्याचे संपूर्ण वर्णन व मार्गदर्शन आयुर्वेदात केलेलं आहे. आयुर्वेद व मनुष्य ह्याचं जवळच नात असल पाहिजे अगदी आपल्या जिवलग मित्रासारखच.

    स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनमं च|” म्हणजेच(To keep health of healthy and to cure diseased.) जो निरोगी आहे त्याला निरोगी ठेवणे व जो रोगी आहे त्याला निरोगी करणे हे आयुर्वेदाचे प्रमुख उद्देश्य आहे. स्वस्थ व्यक्ती कोण? तर ज्याचे शरीर, मन, आणि आत्मा स्वस्थ आहेत तो स्वस्थ आहे.

आजारी पडूच नये म्हणजे रुग्णालयात जाण्याची वेळच येणार नाही असे कोणी विचारल्यास त्याचे उत्तर हो असू शकेल का? तर हो ते शक्य आहे. आपला मित्र आयुर्वेद अश्याच उद्देश्याने आपल्यासाठी तयार आहे.

आपली दिनचर्या कशी असावी? त्यात काय काय बदल करण्याची गरज आहे? प्रत्येक ऋतू मध्ये आपणास कायकाय करायचे आहे काय नाही? आहार कोणता घ्यावा? कुठे? कसा? केव्हा? आणि का?, व्यायाम कोणता? कुठे? कसा? केव्हा?, आहार घेताना काय काय पथ्य पाळावे? कुठल्या चुकीच्या सवयी आहेत? आपल वर्तन कसे असावे ह्या सगळ्या गोष्टीचे आयुर्वेदात वर्णन आहेत.

शरीर मन व आत्मा ह्यांचे स्वास्थ्य म्हणजे संपूर्ण स्वास्थ्य असे आयुर्वेद सांगते. ह्या तिघांचे स्वास्थ्य आपल्याला आयुर्वेद व आध्यात्म शास्राच्या माध्यमातून साधता येते. चला तर मग आता ह्या आयुर्वेदाशी मैत्री करूया.

माझे वडील श्री.मनोहर दामोदर देव(देवनाथ महाराज, अंतुर्ली) ह्यांनी खाली सुविचार आपल्या सर्वांसाठी दिला आहे. चला त्याचे पालन करण्याचा प्रयात करूया.

 सद्विचारे सदाचारे मनःशाांती होते| सत्व आहारे, शुध्द विहारे देही आरोग्य येते||

‍- वैद्य.भूषण मनोहर देव.

ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय व संशोधन केंद्र, जळगाव/अंतुर्ली.

ईमेल- drbhushandeo@gmail.com

7588010703

www.jyotiayurved.com

Lord Dhanwantari

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *